पुण्यात तुमची मुले काय करत आहेत ? तुळापूरच्या कथित एक्स पार्टीत १५६ जण ताब्यात, ८५ लाखांचे अमली पदार्थ जप्त ? PUNE PARTY
PUNE PARTY कोरेगाव भीमा – आळंदी मरकळ मार्गावरील तुळापूर परिसरात नदीकिनारी असलेल्या फार्महाउस वर एका खाजगी बंगल्यात शनिवारी दि ६ रोजीपासून सुरु असलेल्या पार्टीवर दि ७ रोजी पहाटे पोलिसांनी धाड टाकत मोठी कारवाई केली आहे. दारू, गांजा प्रतिबंधित आणि हुक्का फ्लेवर्स, एनर्जी ड्रिंक्स आणि इतर साथ जप्त केला आहे. तुळापूर परिसरात अनधिकृत पार्टी असल्याची खबर पोलिसांना मिळाली आणि ७ जून पहाटे हि कारवाई करण्यात आली.
छाप्याच्या दरम्यान
१५६ जण ताब्यात , १०७ पुरुष आणि ४९ महिला \ तरुणी
२१ वर्षापेक्षा कमी वय असलेल्या ३ व्यक्ती ताब्यात
अल्प प्रमाणात गांजा, हुक्का पॉट्स, फ्लेवर्स जप्त
९ लाखांचा मद्यसासह ८५ लाखांचे साहित्य जप्त
दरम्यान या पार्टीदरम्यान आयोजकांची ओळख अद्याप पटलेली नाही, या सर्व पार्टीत अमली पदार्थांचा वापर झालाय का ?
याची देखील तपासणी करण्यात येत आहे.
या सर्व बाबीतून पुण्यातील हायप्रोफाईल पार्ट्या आणि तरुण तरुणीकडे पालकांचे नसलेले लक्ष यावर समाजात चिंता व्यक्त केली जात आहे.
______________________________________________________________________________________







