Saturday, June 13, 2026
Home विशेष महाराष्ट्र सोलापूर ते गोवा,हैद्राबाद विमानसेवा १९ जूनपासून अनिश्चित काळासाठी बंद ! FLY 91

सोलापूर ते गोवा,हैद्राबाद विमानसेवा १९ जूनपासून अनिश्चित काळासाठी बंद ! FLY 91

0
31

सोलापूर: solapur airport
सोलापूरहून गोवा आणि हैदराबाद हवाईप्रवास करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. पावसाळ्यातील प्रतिकूल हवामान आणि विमानतळावरील अपुऱ्या सुविधांमुळे आगामी काही काळासाठी विमानसेवा स्थगित करण्यात आली आहे. ‘फ्लाय 91’ fly 91 या विमान कंपनीने सोलापूर ते गोवा आणि सोलापूर ते हैदराबाद या मार्गावरील विमानसेवा 19 जूनपासून तात्पुरत्या स्वरूपात बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय किमान दोन ते कमाल तीन महिन्यांसाठी असणार आहे. 
​नाइट लँडिंग आणि दृश्यमानतेचा प्रश्न
सोलापूर विमानतळावर ‘नाइट लँडिंग’ची सुविधा उपलब्ध नसल्याचा फटका या सेवांना बसत आहे. पावसाळ्यात सोलापूर परिसरात दृश्यमानता अत्यंत कमी असते. विशेषतः सोलापूर ते गोवा ही सेवा सायंकाळच्या वेळी असल्याने, यापूर्वीही खराब हवामानामुळे कंपनीला अनेकदा विमाने रद्द करावी लागली होती.

प्रवाशांची सुरक्षितता लक्षात घेता कंपनीने हा निर्णय घेतल्याचे स्पष्ट केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here