Saturday, June 13, 2026
Home गुन्हेगारी शेअर मार्केटमध्ये लॉस ; शिक्षकाने संपूर्ण कुटुंब संपवले ; २२ पानाच्या...

शेअर मार्केटमध्ये लॉस ; शिक्षकाने संपूर्ण कुटुंब संपवले ; २२ पानाच्या लेटर मध्ये लिहिली कहाणी

0
28
मृतांमध्ये योगेश बाळासाहेब पाटील (वय ४०), पत्नी माधुरी पाटील (वय ३७), मुलगा अथर्व (वय ११) आणि शिवांश (वय ९) यांचा समावेश आहे. योगेश पाटील हे नंदुरबार जिल्ह्यातील चौगाव (बु.) येथील जिल्हा परिषद शाळेत मुख्याध्यापक म्हणून कार्यरत होते.

वैराग : बार्शी तालुक्यातील हत्तीज गावात एका सुशिक्षित कुटुंबाच्या दुर्दैवी अंताने संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. शुक्रवारी सकाळी दूध देण्यासाठी आलेल्या व्यक्तीने घराचा दरवाजा ठोठावला, मात्र बराच वेळ कोणताही प्रतिसाद न मिळाल्याने संशय निर्माण झाला आणि त्यातून ही धक्कादायक घटना उघडकीस आली.

दूधवाल्याने आवाज देऊनही दरवाजा न उघडल्याने शेजारी राहणारे मंगेश पाटील यांनीही पाहणी केली. योगेश पाटील नेहमीप्रमाणे बाहेर न आल्याने ग्रामस्थांच्या मदतीने घराचा दरवाजा तोडण्यात आला. घरात प्रवेश करताच पत्नी आणि दोन मुले बेशुद्ध अवस्थेत आढळून आली, तर योगेश पाटील गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसून आले. हे दृश्य पाहून उपस्थितांना मोठा धक्का बसला आणि गावभर शोककळा पसरली. ( Hattiz vairag )

मृतांमध्ये योगेश बाळासाहेब पाटील (वय ४०), पत्नी माधुरी पाटील (वय ३७), मुलगा अथर्व (वय ११) आणि शिवांश (वय ९) यांचा समावेश आहे. योगेश पाटील हे नंदुरबार जिल्ह्यातील चौगाव (बु.) येथील जिल्हा परिषद शाळेत मुख्याध्यापक म्हणून कार्यरत होते.प्राथमिक माहितीनुसार, गुरुवारी मध्यरात्री ही घटना घडली असावी, असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. शेअर बाजारातील आर्थिक नुकसानीच्या तणावातून हे टोकाचे पाऊल उचलण्यात आल्याची चर्चा असली तरी आत्महत्येचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

घटनेची माहिती मिळताच पोलिस उपनिरीक्षक प्रतापसिंह जाधव आणि पोलिस निरीक्षक कुंदन गावडे यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. चारही मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आले असून पत्नी व मुलांच्या मृत्यूप्रकरणी मयत योगेश पाटील यांच्या विरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. या प्रकरणाचा सर्व बाजूंनी तपास सुरू आहे.

२२ पानाच्या लेटर मध्ये लिहिली कहाणी
घटना स्थळावरून पोलिसांना २६ पानी सुसाईड नोट मिळाली आहे. त्यामध्ये आर्थिक व्यवहार, शेअर बाजारातील नुकसान, घेतलेले पैसे आणि मालमत्तेबाबतच्या इच्छांचा उल्लेख असल्याची माहिती आहे. या पत्रात कोणालाही जबाबदार धरले नसल्याचे पोलिस सूत्रांनी सांगितले.

योगेश पूर्णतः निर्व्यसनी
योगेश हे पूर्णतः निर्व्यसनी होते. ते मांसाहारसुद्धा करत नव्हते. योगेश यांच्या पत्नी माधुरी यांचे शिक्षण डी.एड. पर्यंत झाले होते. इतक्या साऱ्या दुःखात आपण एकटे राहू शकत नाही. मुलांचा सांभाळ कोण करणार ? हे आयुष्यभर दुःख सोसत बसणे हे होऊ शकत नसल्याचे योगेश यांनी भावनिकरित्या सुसाईड नोटमध्ये म्हटले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here