SOLAPUR :सोलापुरात अन्न व औषध प्रशासन (FDA) विभागाने भेसळखोरांविरोधातील मोहीम अधिक तीव्र करत आणखी एक मोठी कारवाई केली आहे. दक्षिण सोलापूर तालुक्यातील गावडेवाडी येथील रामदेव डेअरीवर टाकलेल्या छाप्यात तब्बल ६ लाख ९१ हजार ४४५ रुपये किमतीचा १ हजार ८०७ किलो निकृष्ट व भेसळयुक्त बर्फीचा साठा जप्त करण्यात आला. या कारवाईमुळे मिठाई उत्पादकांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. अन्न व औषध प्रशासन विभागाचे सहआयुक्त तुकाराम मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेल्या विशेष मोहिमेअंतर्गत ही धडक कारवाई करण्यात आली. अन्न सुरक्षा अधिकारी रामानंद स्वामी आणि रेणुका पाटील यांच्या पथकाने गावडेवाडी येथील महादेव कोरे यांच्या जागेतील रामदेव डेअरी येथे छापा टाकला. तपासादरम्यान संबंधित डेअरी कोणताही वैध अन्न परवाना न घेता सुरू असल्याचे उघडकीस आले. तपासात धक्कादायक बाब समोर आली. शुद्ध दूध MILK किंवा खव्यापासून बर्फी तयार करण्याऐवजी दुधातील स्निग्धांश काढून त्याऐवजी वनस्पती तूप वापरून मिठाई तयार केली जात होती. ग्राहकांची दिशाभूल करण्यासाठी या मिठाईला खऱ्या बर्फीसारखा रंग, पोत आणि स्वरूप देण्यात आले होते, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली. कारवाईदरम्यान एकूण १ हजार ८०७ किलो बर्फीचा साठा जप्त करण्यात आला असून त्यातील चार नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. प्रयोगशाळेचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर संबंधितांवर अन्न सुरक्षा व मानके कायद्यानुसार कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले. TUKARAM MUNDE
Home ताज्या बातम्या तुकाराम मुंडेंचा सोलापुरात दणका ! मिठाई उत्पादकांमध्ये मोठी खळबळ Tukaram Munde...









