बार्शी | प्रतिनिधी
करमाळा पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या पॉक्सो प्रकरणातील आरोपी रखमा गोरे यास बार्शी येथील जिल्हा व सत्र न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. मा. जिल्हा व सत्र न्यायाधीश यू. एल. जोशी यांनी आरोपीस ₹५०,०००/- रुपयांच्या जातमुचलक्यावर जामिनावर मुक्त करण्याचे आदेश दिले.
सदर प्रकरणात आरोपीवर सोशल मीडियाच्या माध्यमातून अल्पवयीन मुलीशी संपर्क साधल्याचा आरोप आहे. तसेच व्हिडिओ कॉलद्वारे संवाद साधून स्क्रीनशॉट व व्हिडिओ तयार केले आणि ते सोशल मीडियावर प्रसारित करण्याची धमकी दिल्याचा आरोप करण्यात आला होता. या प्रकरणी करमाळा पोलीस ठाण्यात पॉक्सो कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. POCSO
जामीन अर्जाच्या सुनावणीदरम्यान बचाव पक्षातर्फे ॲड. एस. व्ही. इनामदार यांनी आरोपीची बाजू प्रभावीपणे मांडली. न्यायालयाने बचाव पक्षाचा युक्तिवाद ग्राह्य धरत आरोपीस जामीन मंजूर केला. या प्रकरणात आरोपीतर्फे ॲड. एस. व्ही. इनामदार यांनी काम पाहिले, तर सरकारतर्फे ॲड. डी. डी. देशमुख यांनी बाजू मांडली. S V INAMDAR DD DESHMUKH









