India :
Apple चे MacBook किंवा iPad घेण्याचा विचार करणाऱ्या तरुणांसाठी मोठी बातमी आहे. Apple ने 25 जूनपासून जागतिक बाजारात MacBook, iPad आणि निवडक अॅक्सेसरीजच्या किमती वाढवल्या आहेत. काही मॉडेल्सच्या किमतीत तब्बल ₹70,000 पर्यंत वाढ झाल्याची माहिती समोर आली आहे.या दरवाढीमागे AI म्हणजेच कृत्रिम बुद्धिमत्तेची वाढती मागणी हे मोठे कारण मानले जात आहे. AI डेटा सेंटर्ससाठी लागणाऱ्या मेमरी चिप्सची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यामुळे DRAM मेमरी चिप्सच्या किमतीत जागतिक स्तरावर मोठी वाढ झाली असून त्याचा परिणाम थेट इलेक्ट्रॉनिक गॅझेट्सच्या किमतीवर होताना दिसत आहे.
विद्यार्थी, कंटेंट क्रिएटर्स, डिझायनर्स, एडिटर्स आणि टेक प्रोफेशनल्समध्ये MacBook आणि iPad ची मोठी क्रेझ आहे. पण नव्या दरवाढीनंतर Apple डिव्हाइस खरेदी करणे आणखी महाग होणार आहे. विशेषतः भारतात MacBook आणि iPad अजूनही मोठ्या प्रमाणात आयात केले जात असल्याने ग्राहकांना आयात शुल्क आणि GST चा अतिरिक्त भार सहन करावा लागतो.रिपोर्टनुसार, MacBook Pro सिरीजमध्ये भारतातील किंमतवाढ अमेरिकेच्या तुलनेत अधिक दिसून येत आहे. काही मॉडेल्समध्ये भारतातील वाढ जवळपास ₹70,000 पर्यंत गेल्याचे नमूद करण्यात आले आहे. iPad Air, iPad Pro आणि Apple TV च्या किमतींमध्येही वाढ दिसून आली आहे.
महत्त्वाची बाब म्हणजे iPhone च्या किमतीत सध्या कोणताही बदल होणार नसल्याचे सांगितले जात आहे. मात्र MacBook किंवा iPad घेण्याचा प्लॅन करत असाल, तर आता बजेट पुन्हा तपासावे लागणार आहे.एकूणच, AI ची वाढती क्रेझ आता फक्त टेक कंपन्यांच्या नफ्यापुरती मर्यादित राहिलेली नाही, तर तिचा थेट परिणाम सामान्य ग्राहकांच्या खिशावरही दिसू लागला आहे. त्यामुळे तरुणांनी Apple डिव्हाइस खरेदी करण्यापूर्वी किंमत, गरज, EMI आणि पर्यायी ब्रँड्स यांचा नीट विचार करणे गरजेचे आहे.









