Tuesday, July 28, 2026
Home ताज्या बातम्या आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर बार्शी तालुका पोलिसांची धडक मोहीम; 53 सराईत गुन्हेगारांवर प्रतिबंधक...

आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर बार्शी तालुका पोलिसांची धडक मोहीम; 53 सराईत गुन्हेगारांवर प्रतिबंधक कारवाई

0
33
नवीन प्रभारी अधिकारी सपोनी अक्षय सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी कठोर पावले
बार्शी | प्रतिनिधी
आगामी आषाढी वारी तसेच विविध सण-उत्सव शांततापूर्ण, सुरक्षित आणि निर्विघ्न वातावरणात पार पडावेत या उद्देशाने बार्शी तालुका पोलीस स्टेशनने रेकॉर्डवरील गुन्हेगारांविरुद्ध धडाकेबाज प्रतिबंधक कारवाई हाती घेतली आहे. या विशेष मोहिमेत आज एकूण 53 आरोपींवर प्रतिबंधक कारवाई करण्यात आली.मा. पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी (सोलापूर ग्रामीण) आणि मा. अप्पर पोलीस अधीक्षक विजय कबाडे (सोलापूर ग्रामीण) यांच्या मार्गदर्शनाखाली बार्शी तालुका पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी म्हणून पदभार स्वीकारल्यानंतर सपोनी अक्षय सोनवणे यांनी गुन्हेगारांविरोधातील प्रतिबंधक कारवायांना वेग दिला आहे.

‘टू प्लस’ आणि सराईत गुन्हेगारांना पोलिसांचा इशारा; कारवाया पुढेही सुरू राहणार

‘टू प्लस’, रेकॉर्डवरील आणि सराईत गुन्हेगारांमध्ये सुधारणा व्हावी, त्यांनी कायद्याचे पालन करावे आणि पुन्हा गुन्हेगारीकडे वळू नये, या उद्देशाने ही मोहीम राबविण्यात येत असल्याचे पोलिसांनी सांगितले.सदर कारवाई सपोनी अक्षय सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक कुलदीप सोनटक्के, पोलीस उपनिरीक्षक आबासाहेब शिरगिरे, ग्रेड पोलीस उपनिरीक्षक राजकुमार यावलकर, बीट अंमलदार सदाशिव गवळी, सोमनाथ खांडेकर, अरुण डुकळे, प्रदीप चौधरी, गणेश दळवी तसेच बार्शी तालुका पोलीस स्टेशनच्या अधिकारी व अंमलदारांच्या पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली. सोलापूर ग्रामीण पोलीस दलाकडून गुन्हेगारांविरुद्ध प्रतिबंधक कारवाई सातत्याने सुरू असून, कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी तसेच गुन्हेगारी प्रवृत्तीवर प्रभावी नियंत्रण ठेवण्यासाठी भविष्यातही अशा कठोर कारवाया सुरू राहणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here