Sunday, June 7, 2026
Home राजकारण Rajendra Raut on Ranjitsinh Mohite Patil राजेंद्र राऊत रणजितसिंह मोहिते पाटील यांच्याबद्दल...

Rajendra Raut on Ranjitsinh Mohite Patil राजेंद्र राऊत रणजितसिंह मोहिते पाटील यांच्याबद्दल नेमकं काय म्हणाले ?

0
36
"मी रणजितसिंह मोहिते पाटील, माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांच्याशी माझा संवाद असतोच. मात्र, विधान परिषद निवडणुकीसंदर्भात माझं त्यांच्याशी बोलणं झालेलं नाही. त्यांना भेटलेलं आवडेल की नाही, याचाही विचार करावा लागेल. दरम्यान, माजी आमदार रणजितसिंह मोहिते पाटील हे आता भारतीय जनता पक्षात आहेत की नाही, हेही मला तपासून पाहावं लागेल"

VishwaTVmarathi :
विधान परिषदेचे भाजप उमेदवार राजेंद्र राऊत
यांनी पंढरपुरात जाऊन नाराज माजी आमदार प्रशांत परिचारक यांची भेट घेतली. परिचारक यांच्या भेटीनंतर माध्यमांशी बोलताना राऊत यांनी भाजपचे माजी आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांच्याबाबत मोठं विधान केले आहे, त्यामुळे रणजितदादांची पुन्हा चर्चा सुरू झाली आहे. विधान परिषदेच्या सोलापूर स्थानिक स्वराज संस्था मतदारसंघातून भाजपकडून माजी आमदार प्रशांत परिचारक आणि राजेंद्र राऊत यांच्यात उमेदवारीसाठी स्पर्धा होती. मात्र, पक्षाकडून राऊत यांना उमेदवारी देण्यात आली, त्यामुळे परिचारक नाराज झाल्याची चर्चा होती राजेंद्र राऊत यांनी नाराज प्रशांत परिचारक यांची पंढरपुरात परिचारक वाड्यावर जाऊन भेट घेतली.

त्या वेळी उमेश परिचारक व इतर पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. परिचारक यांच्या भेटीनंतर राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधला, त्यावेळी त्यांना रणजितसिंह मोहिते पाटील यांना भेटणार का, असा प्रश्न विचारण्यात आला होता.त्यावर राजेंद्र राऊत म्हणाले,

Rajendra Raut on Ranjitsinh Mohite Patil राजेंद्र राऊत रणजितसिंह मोहिते पाटील यांच्याबद्दल नेमकं काय म्हणाले ?
“मी रणजितसिंह मोहिते पाटील, माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांच्याशी माझा संवाद असतोच. मात्र, विधान परिषद निवडणुकीसंदर्भात माझं त्यांच्याशी बोलणं झालेलं नाही. त्यांना भेटलेलं आवडेल की नाही, याचाही विचार करावा लागेल. दरम्यान, माजी आमदार रणजितसिंह मोहिते पाटील हे आता भारतीय जनता पक्षात आहेत की नाही, हेही मला तपासून पाहावं लागेल”

शरद पवारांपुढे माढाचा पेच : उमेदवारीसाठी रणजितसिंह मोहिते पाटील भाजपच्या वाटेनं जाणार? - BBC News मराठी

असेही विधान माजी आमदार राजेंद्र राऊत यांनी केले आहे, त्यामुळे मोहिते पाटील यांच्या भाजपमधील स्थानाविषयी चर्चा सुरू झाली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here