शरद पवार यांचे ठरले, या पक्षासाेबत जाणार, ठाकरेंना धक्का !
शरद पवार एनडीएमध्ये जाणार अशी राज्याच्या राजकारणात जोरदार चर्चा सुरू झाली आहे. महाविकास आघाडीतून बाहेर पडून राष्ट्रवादी काँग्रेस एनडीएमध्ये सहभागी होणार असल्याच्या चर्चेमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
मुंबई : राज्याच्या राजकारणात माेठी उलथापालथ लवकरच हाेणार असल्याचे दिसू लागले असून राजकीय वर्तुळात याची सध्या जाेरदार चर्चा सुरू झाली आहे. उध्दव ठाकरे यांच्या शिवसेनेला धक्कयावर धक्के बसत असतानाच आता महाविकास आघाडीतून बाहेर पडून शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस एनडीए मध्ये सामिल हाेणार असल्याची माहिती समाेर येत आहे. राष्ट्रवादीच्या गाेटातूनही याची दबक्या आवाजात चर्चा सुरू आहे. एका भाजपच्या बड्या नेत्याच्या माध्यमातून शरद पवारांची राष्ट्रवादी यासंदर्भात चर्चा करत असल्याचेही सांगण्यात येत आहे. जर शरद पवार महाविकास आघाडीतून बाहेर पडून एनडीए साेबत गेले तर उध्दव ठाकरे यांच्यासाठी ताे सर्वात माेठा धक्का असणार आहे.
शरद पवार एनडीएमध्ये जाणार? चर्चेकडे सर्वांचे लक्ष
यापूर्वी काही दिवसापूर्वी शरद पवारांच्या संदर्भात अशीच चर्चा सुरू झाली हाेती. ते आपला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष बरखास्त करून काँग्रेसमध्ये सहभागी हाेणार असल्याची ही चर्चा हाेती. यासंदर्भात नाना पटाेले यांनीही सूचक वक्तव्य केले हाेते. दिल्लीत काँग्रेसने राज्यातील काही वरीष्ठ नेत्यांसाेबत यासंदर्भात चर्चा केल्याचीही माहिती समाेर आली हाेती. परंतु शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने हे सर्व दावे ेटाळून लावले हाेते. काँग्रेसमध्ये जाणार नाही, असे काही नेत्यांनी थेट सांगून टाकले हाेते.
या चर्चेची धूळ खाली बसत नाही ताेच आता एनडीए साेबत शरद पवार जाणार असल्याची जाेरदार चर्चा हाेताना दिसत आहे. राज्यातील एका जेष्ठ भाजप नेत्याने यासाठी पुढाकार घेतला असून दाेन्ही बाजुनी हे नेते चर्चा करत असल्याचे सांगण्यात येत आहे. शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे आठ खासदार आणि दहा आमदार आहेत. राज्यात सध्या ाेेडााेडीचे राजकारण जाेरात सुरू आहे. उध्दव ठाकरेंच्या शिवसेनेनंतर कदाचित शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे खासदारही ूटू शकतात, असे आराखडे बांधले जात आहेत. त्यामुळे या सगळ्या पार्श्वभूमीवर काेणी ाेडााेडीचे राजकारण करण्याची वाट बघत बसण्यापेक्षा स्वत: शरद पवारच एनडीए मध्ये सामिल हाेतील, असे राजकीय निरीक्षकांचे म्हणणे आहे.
शरद पवार एनडीए साेबत गेले तर एनडीएला आठ खासदारांचे बळ मिळणार आहे. या बदल्यात सुप्रिया सुळे यांना केंद्रात मंत्रीपदही मिळण्याची शक्यता व्यक्त हाेताना दिसत आहे. आता शरद पवारांनी एनडीएमध्ये सामिल हाेण्याचा निर्णय घेतलाच तर राज्याच्या राजकारणालाही माेठी कलाटणी मिळू शकते. सध्या भाजपचे वरीष्ठ नेते यासंदर्भात गांभीर्याने चर्चा करत असल्याचीही माहिती समाेर आली आहे. येत्या काही दिवसात यासंदर्भातील शरद पवारांची नेमकी काय भूमिका आहे, हे समाेर येईल. ताेपर्यंत राजकीय वर्तुळात मात्र याची जाेरदार चर्चा सुरू राहिल









